Posts

स्त्रीचे अस्तित्व....

 सगळ्यांची काळजी घेत व इच्छा पूर्ण करण्यात स्त्रीचे आयुष्य संपून जाते.... प्रत्येक नाते सांभाळत स्वतःचे अस्तित्व विसरून जाते.   माझे नाव मनीषा म्हणजे इच्छा आणि ती कोणी विचारलीच नाही ! मी लहान होते तेव्हा पासूनच खूप विचार करून कामे करायची माझ्या आईला एक वेळेची जरी मी कामात मदत करू शकले तर मला खूप छान वाटायचे, कोणाला भांडायचे नाही एका गरीब गाई प्रमाणे, माझ्या घरी सगळे  १० वि , १२ वि मध्ये नापास झ्हाले कि त्यांचे लग्न करून दिले फक्त मी पास झाले पण तरीही माझे मला काही कळेल तोपर्यंत माझे लग्न अवघ्या १५ दिवसात झाले, मला पोलीस व्हायचे होते आई वडिलांना घरात मदत करायची होती पण ! खूप लहान वयात लग्न झ्हाल्यामुळे आई वडिलांची ओढ खूप, सासरी कामात वेळ निघून जायचा सगळे कामापुरतेच बोलायचे मग मी माझ्या भावना वही मध्ये मांडायला सुरुवात केली